घरांवरील व्याजदरात स्टेट बॅंकेकडून कपात

मुंबई – भारतातील घरासाठी कर्ज देणाऱ्या संस्थांतील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने 30 लाख रुपयांपर्यंतच्या घरावरील कर्जाच्या व्याजदरात 0.05 टक्‍क्‍यांनी कपात केली आहे.

गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍यांनी कपात केल्यानंतर शुक्रवारी उशिरा स्टेट बॅंकेने हा निर्णय घेतला. कमी आणि मध्यम किमतीच्या घर खरेदीदारांना पतधोरणाचा लवकर फायदा मिळावा यासाठी स्टेट बॅंकेने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

स्टेट बॅंकेच्या ठेवीवरील व्याजदर इतर बॅंकापेक्षा कमी आहेत. त्यामुळे आगामी काळात ठेवीवरील व्याजदर कमी होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)