पांड्या आणि राहुलचे निलंबन मागे

मुंबई – कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यानंतर बंदीचा सामना करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन बीसीसीआयने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दोघांना दिलास मिळाला आहे. दरम्यान, पांड्या-राहुल प्रकरणी सुप्रीम कोर्टात 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या आणि राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले असले तरी या दोघांची चौकशी मात्र होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेले विधान चांगलेच भोवले होते. दोघांनाही ऑस्ट्रेलिया येथिल एकदिवसीय दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एका आठवड्यानंतर निर्णय घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत बऱ्याच जणांना चिंता वाटत होती. आणि काही आजी माजी खेळाडूंनी त्याबाबद जाहीर वक्तव्य देखिल केले होते. त्या अनुशंगाने बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी त्यांची बाजू घेतल्याचे निदर्शनास आले आहे. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली होती.

खन्ना यांनी पत्रात लिहिले होते की, हार्दिक आणि राहुल यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी बोलवण्यात आले. हार्दिक आणि राहुल या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. जोपर्यंत या दोघांच्या बाबतीत निर्णय येत नाही. तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी देण्यात यावी. त्यांना लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे त्यांच्या विनंतील मान्य करत आज दोघांचंही निलंबन रद्द करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)