पाकविरुद्ध आक्रमक कारवाई व्हावी – गणपतसिंग वसावा

सूरत – पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात एक आक्रमक कारवाईची गरज आहे. या कारवाईकरिता आगामी लोकसभा निवडणूक लांबणीवर टाकावी लागली तरीही चालेल, असे विधान गुजरातचे मंत्री गणपतसिंग वसावा यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पाकिस्तानात देखील एक शोकसभा व्हायला हवी, असे वसावा यांनी सूरतमधील एका जनसभेला संबोधित करताना म्हटले आहे. पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती दहशतवाद्याने 100 किलोग्रॅमहून अधिक वजन असलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी निवडणूक रोखावी लागली तरी बेहत्तर पण पाकिस्तानला धडा शिकवा. आगामी निवडणुकीला दोन महिन्यांचा विलंब झाला तरी चालेल. आमच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आम्ही 125 कोटी भारतीय इच्छितो. आमच्या सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड आम्ही निश्‍चितच घेणार आहोत. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांवर पूर्ण विश्‍वास असल्याचे वसावा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)