जीएसटीसाठी राष्ट्रीय पातळीवर लवादाची निर्मिती होणार

नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाचे राष्ट्रीय पीठ नवी दिल्लीत राहणार आहे. यामध्ये केंद्राचा तंत्रविषयक एक सदस्य आणि राज्याचा तंत्रविषयक एक सदस्य राहणार आहे. जीएसटीएटीच्या राष्ट्रीय पीठ निर्मितीसाठी 92.50 लाख रुपयांचा खर्च होणार असून, त्यानंतर दरवर्षी 6.86 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरण हा वस्तू आणि सेवा कर कायद्यातला अपील संदर्भातला दुसरा मंच आहे तर केंद्र आणि राज्य यांच्यातला तंटा सोडवणारा पहिला सामायिक मंच आहे.

केंद्र आणि राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत, अपिलीय अधिकाऱ्यांनी पहिल्या अपिला अंतर्गत काढलेल्या आदेशा विरोधातले अपील, वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाकडे येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे न्यायाधीकरण, केंद्र आणि राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्यात सामायिक आहे. हा सामायिक मंच असल्यामुळे, वस्तू आणि सेवा कराअंतर्गत उद्‌भवलेल्या तंट्याच्या निराकारणात एकसमानता असेल याची खातरजमा वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरण करेल यामुळे संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कराची एकसमान अंमलबजावणी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)