‘जीएसटी’ सोपा केल्यास करदाते वाढतील

कोलकाता – जीएसटी भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केली तर देशातील अनेक छोटे व्यापारी कर भरण्यास पुढे येतील, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने अथमंत्रालयाला पुन्हा सुचविले आहे.

देशात सर्वसाधारणपणे 7 कोटी इतके छोटे व्यापारी आहेत. जर ही कर प्रक्रिया सुटसुटीत केली तर त्यातील निम्मे लोक कर भरू शकतील. जर व्यापाऱ्यांचा त्रास झाला नाही तर मोठ्या प्रमाणात व्यापारी कर भरण्यासाठी पुढे येतील, असे महासंघाच्या एका सदस्याने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी सांगितले की, अगोदरच जीएसटीच्या गुंतागुंतीच्या पद्धतीमुळे देशातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास झाला आहे. पार्टल व्यवस्थित चालत नव्हते. कर टप्प्याचे अतार्किक वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर परतावा वेळेवर मिळण्याची शाश्‍वती नाही.

त्यांनी सांगितले की, 35 टक्‍के व्यापाऱ्यांकडे संगणकच नाही. त्यामुळे त्यांना या कराबाबतचे कामच करता येत नाही. जीएसटी कायदा आणि इतर नियमाबाबत व्यापाऱ्यांना वेळेवर माहिती मिळतच नाही. त्यातच यातील नियम सारखे बदलत गेल्यामुळे व्यापाऱ्यातील संभ्रम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून मार्ग काढण्याचा सरकारने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)