मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 7 टक्के राहील असे म्हटले आहे. मात्र गोल्डमन सॅक्स या संस्थेने विकासदर क्रुडचे दर कमी असल्यामुळे आणि स्थिर सरकारमुळे 7.2 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बॅंकांची कमकुवत परिस्थिती, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थासमोरील पेच या कारणामुळे रिझर्व्ह बॅंकेने विकासदर अनुमान कमी केले असल्याचे या संस्थेला वाटते. मात्र काही सकारात्मक घडामोडी घडणार असल्यामुळे विकासदर 7.2 टक्के होईल.