‘गुगल’चा अब्जावधी डॉलरचा विस्तार कार्यक्रम

न्यूयॉर्क – जगभरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्या आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी दिवसेंदिवस प्रयत्न करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गुगल कंपनीने 72 हजार कोटींचा नवीन कॅम्पस उभारणार असल्याची घोषणा केली आहे.

यासाठी 1 अब्ज डॉलर्स लागणार असून कॅम्पसला गुगल हडसन स्क्वेयर असे नाव ठेवण्यात आले. या कॅम्पसच्या लांबी व रुंदीचा आकार लक्षात घेता तो जवळपास 17 लाख स्वेअर फूट असणार असल्याचे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कॅम्पसचे काम साधारणपणे 2020 पर्यंत पूर्ण आहे. हडसन स्क्वायर कॅम्पसची उभारणी ही न्यूयॉर्कमध्ये करण्यात येणार असून हे ठिकाण बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी मुख्य स्थान असणारे कार्यालय उभारणार आहे. त्याचा फायदा भविष्यात कंपनीच्या व्यवसाय वृद्धी करण्यासाठी सकारात्मक राहणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)