देशभर सोन्याचा एकच दर ठरविणारी यंत्रणा नाही – चौधरी

नवी दिल्ली – देशभर सोन्याचा एकच दर ठरविणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. अनेक कारणांमुळे तसे करणे नजिकच्या काळात शक्‍य वाटत नाही, असे ग्राहक व्यवहार राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, सोन्याचे दर साधारणपणे आयातशुल्क, मूलभूत सीमाशुल्क, इतर कर, वाहतुकीचा खर्च आणि शुद्धतेच्या आधारावर ठरविले जातात. त्यामुळे देशातील विविध भागात सोन्याचे दर वेगवेगळे असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानिक सोने व्यापारी संघटना त्या दिवसाचे सोन्याचे दर ठरवित असतात. गेल्या वर्षी भारताने 700 टन सोने आयात केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)