गोव्यात कॉंग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान

पणजी – आगामी तीन दिवसांचे विधानसभा अधिवेशन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसतर्फे राज्यात येत्या 8 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान छेडण्यात येणार असून पणजीतून त्याला सुरुवात होणार आहे. या अभियानावेळी भाजप आघाडी सरकारचे अपयश व राफेल मुद्दा जनतेपर्यंत या माध्यमातून पोहचविण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ट्‌विट करून माहिती दिली आहे.

हल्लीच कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक झाली त्यावेळी अधिवेशनाचा कालावधी कमी करून जनतेचे प्रश्न मांडण्यास सरकार विरोधकांना आवश्‍यक वेळ देत नाही ही माहिती जनतेपर्यंत पोहचिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नोकरभरतीतील अंदाधुंदी व खाण व्यवसास सुरू करण्यास राज्य सरकारला येत असलेले अपयश याची जागृती केली जाणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)