दोन ओळखपत्र बाळगल्याबद्दल तक्रार आल्यानंतरच ‘गंभीर’वर कारवाई होणार

नवी दिल्ली – भाजपचे पूर्व दिल्लीचे उमेदवार गौतम गंभीर यांनी दोन मतदान ओळखपत्र बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली तर कारवाई करण्यात येईल, असे दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.

गौतम गंभीर यांच्याजवळ राजेंद्रनगर आणि करोल बाग अशा दोन ठिकाणचे ओळखपत्र आहे, असा आरोप आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी केला आहे. याप्रकरणी आतिशी यांनी कोर्टातही धाव घेतली आहे. त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे यानी म्हटले आहे.

गौतम गंभीरच्या दोन ओळखपत्रांबाबत आम्हाला प्रसारमाध्यमांतून समजले, मात्र याबाबत कोणतीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. तक्रार आली की आयोगकडून योग्य कारवाई करण्यात येईल, असे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंह यांनी सांगितले. गौतम गंभीर यांनी मात्र दोन ठिकाणच्या मतदान ओळखपत्रांचा आरोप फेटाळून लावला आहे. राजेंद्र नगर येथून एकच मतदान ओळखपत्र असल्याचे त्याने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)