लग्नात फटाके वाजविल्यास तुरूंगवास!

नोएडा – यापुढे जर उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात लग्नसोहळ्यात फटाके वाजवले तर नवरदेव आणि त्याच्या वडिलांची रवानगी थेट तुरुंगात केली जाणार आहे. या दोघांना 15 दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात जर कोणी फटाके फोडत असतील तर त्याचा व्हिडीओ पोलिसांच्या संकेतस्थळावर पोस्ट करा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

गौतम बुद्धनगरचे जिल्हाधिकारी बीएन सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अंमलात आणण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे. त्यानुसारच लग्नसोहळ्यात फटाके वाजवण्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लग्नसोहळ्यातील आतषबाजीचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणाऱ्याचे नावही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. माहिती मिळताच पोलीस लग्नस्थळी जाऊन नवरदेव व त्याच्या वडिलांना अटक करणार आहेत. तसेच फटाके वाजवणाऱ्यांचीही रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात रात्री दहा नंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवणारे व नवरा मुलगा न त्याचे वडील, वधूचे वडील यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फटाक्‍यातून निघणारा विषारी वायू आरोग्यास अपायकारक असून प्रखर उजेड व मोठ्या आवाजामुळेही नुकसान होते. तसेच प्रदूषणातही वाढ होते. यामुळे मोठया आवाजावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. पण सर्व नियमांची पायमल्ली होत असल्याने सिंह यांनी गौतम बुद्धनगर जिल्ह्यात हे नियम लागू केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)