वित्तीय गुंतवणूक साधनांकडे लोकांचा कल वाढला

मुंबई – भारतात अगोदर सोने आणि रिअल ईस्टेट सारख्या क्षेत्रात लोक गुंतवणूक अधिक करीत होते. मात्र, आता अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण होत असल्यामुळे चलनवाढीपेक्षा अधिक परताव्यासाठी लोक वित्तीय साधनाकडे वळू लागले आहेत. आगामी काळातही हा कल असाच राहण्याची शक्‍यता आहे.

याबाबात बोलतांना मिराई मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे फंड व्यवस्थापक अंकित जैन आणि वृजेष कसेरा यांनी सांगितले की सध्या मोठ्या शहरतील गुंतवणूकदार वित्तीय उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. मात्र इंटरनेटमुळे ही माहिती भारतात सर्वदूर जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानामुळे आणि छोट्या शहरातून ही लोक अशा प्रकारच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत ते म्हणाले की, मिराई संस्था सध्या 15 शहरात कार्यरत आहे. त्याचबरोर आगामी काळात आणखी 10 शहरात जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही कंपनी विविध क्षोत्रातील 16 हजार कोटींचे व्यवस्थापन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय शेअर बाजारासाठी दीर्घ पल्ल्यात चांगले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबर भारतीय रोखे बाजारही बळकट झाला आहे.

1991 अगोदर गुंतवणूकदाराकडे वित्तीय उत्पादनांच्या अतिशय मर्यादित संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे जनतेची बचत मुख्यत: सोने किंवा बांधकाम क्षेत्रात जात असे, मात्र आता शिथिलीकरणामुळे वित्तीय क्षेत्रात मुच्युअल फंड आणि इतर उत्पादने उपलब्ध झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)