जीएसटी परिषद बैठक – छोट्या व्यवसायिकांना केंद्र सरकारचा दिलासा

नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या तोडांवर केंद्र सरकारकडून छोट्या व्यापाऱ्यांना खूश करण्यासाठी जीएसटी परिषदेत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेची आज 32 वी बैठक होती. या बैठकीत 40 लाखांपर्यत उलाढाल असलेल्या व्यवसायांवर आता जीएसटी लागू करण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान , यापूर्वी व्यापाऱ्यांची जीएसटीची मर्यादा ही आधी 20 लाखांपर्यत होती, आता ती वाढविण्यात आली आहे. 20 लाखांची मर्यादा ही 40 लाखांपर्यत करण्यात आली आहे. त्याचबरोबर छोट्या व्यावसायिकांना काॅम्पोझिशन स्किमचा फायदाही आता घेता येणार आहे. या स्किमची मर्यादा दीड कोटी इतकी करण्यात आली आहे. योजनेत सहभागी असलेल्याना आता दर 3 महिन्याला कर भरावा लागणार आहे, मात्र रिटर्न्स  हे वर्षातून एकदाच भरावे लागतील.

हा नवा नियम 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहे. या नियमामुळे व्यापाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)