मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई – वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के आरक्षणानुसार प्रवेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांच्या अंतिम निर्णयावर या प्रवेशाचे भवितव्य अवलंबून असेल, असंही उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.

राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं आहे. मात्र नोकरीतील आरक्षणाला हायकोर्टाने यापूर्वी स्थगिती दिली होती. त्यानंतर आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शैक्षणिक आरक्षणालाही स्थगितीची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवलं आहे.

मराठा आरक्षणबाबत मुंबई हायकोर्टात गेल्या 6 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरु होती. याप्रकरणात अनेक जनहित याचिका आहेत. मराठा आरक्षणाविरोधात आणि आरक्षणाच्या समर्थनात अनेक याचिका होत्या. या सर्व याचिकांवरील सुनावणी आज पूर्ण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)