पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता मंदावली

नवी दिल्ली – पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकासदर नोव्हेंबरमध्ये 3.5 इतका कमी नोंदला गेला आहे. सिमेंट, वीज आणि कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये कमजोरी आल्याचे उत्पादकता कमी झाल्याचे सांगण्यात आले.

नोव्हेंबरमध्ये कोळशाच्या उत्पादकतेत 3.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली. जी ऑक्‍टोबरला 11.3 टक्‍क्‍यावर होती. इलेक्‍ट्रिसिटी जनरेशनमध्ये नोव्हेंबरमध्ये 5.4 टक्‍क्‍यांनी वाढला. मुख्य क्षेत्रांतील कंपन्यांची वाटचालीत नॉन ऑईल मर्चेडाइज एक्‍स्पोर्ट आणि ऑटोमोबाईल उत्पादनासह अन्य उत्पादन करणाऱ्य़ा कंपन्यांच्या विकासामध्ये घट झाली आहे.

कोळसा उत्पादन, रिफायनरी उत्पादने, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट आणि इलेक्‍ट्रिकलसह आठ पायाभूत सुविधा देणाऱ्य़ा क्षेत्रांचा औद्योगिक उत्पादनातील वाटा 40 टक्‍क्‍यांचा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)