इंडियन ऑईल कंपनीला झाला नफा

बीएसएनएल, एअर इंडिया मात्र रुतले तोट्याच्या गाळात


सरकारच्या निर्गुंतवणूक मोहिमेला मिळाले यश

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), ओएनजीसी आणि एनटीपीसी यांचा आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये सर्वांत जास्त नफा कमावणाऱ्या कंपनीच्या यादीत समावेश झाला आहे. दुसरीकडे बीएसएनएल, एअर इंडिया आणि एमटीएनएल यांना सलग दुसऱ्या वर्षात सर्वांत जास्त तोट्याचा फटका बसल्याची माहिती संसदेत सादर करण्यात आलेल्या पब्लिक एंटरप्राईजेस सर्वे 2017-18 मध्ये देण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2017-18मध्ये सरकारी कंपन्याच्या नफ्यात आयओसीला 13.37 टक्‍के, ओएनजीसी 12.49 टक्‍के आणि एनटीपीसी कंपनीला 6.48 टक्‍क्‍यांची हिस्सेदारी मिळाली आहे. तर सर्वाधिक कमाईत चौथ्या स्थानी कोल इंडिया आणि पाचव्या नंबरला पॉवरग्रीड राहिली आहे.

पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत समावेश असणाऱ्या कंपन्यांमध्ये पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा समावेश झाला आहे. एकूण 184 सरकारी कंपन्यांना जितका नफा झाला त्या प्रमाणापेक्षा 61.83 टक्‍क्‍यांची फायद्याचे पहिल्या दहामध्ये असणाऱ्या कंपन्यांना झाल्याची नोंद केली आहे.

बीएसएनएल, एअर इंडिया आणि एमटीएनएल या कंपन्यांचा एकूण नफा 52.15 टक्‍के राहिला आहे. तर एकूण 71 सरकारी कंपन्यांच्या नुकसानीत 84.71 टक्‍क्‍याची हिस्सेदारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान सरलेल्या वर्षात निर्गुंतवणुकीतून केंद्र सरकारला जवळजवळ 77 हजार कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)