अर्थ अवरनिमित्त आज एक तास वीज बंद ठेवण्याचे आवाहन

वीज वाचवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणजे- ‘अर्थ आवर’

‘अर्थ अवर’ उपक्रमांतर्गत शनिवारी जगभरात सायंकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत एक तास वीज वापर स्वेच्छेने बंद ठेवावा, असे आवाहन विविध संस्थेव्दारे करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून 180 देश एकत्र येऊन ‘अर्थ अवर’ या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. भारतातही अनेकजण यामध्ये सहभागी होत आहेत.

त्यामुळे विजेची बचत होणार असून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. विक्रमी उष्म्यामुळेच 2016 या वर्षाची ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून नोंद झाली आहे. तापमानातील ही वाढ अशीच वाढत राहिली तर पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास होईल असा इशारा याआधीच जागतिक हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

वीज वाचवण्यासाठी आज रात्री एक तास सर्वत्र अंधार होईल. याचे कारण म्हणजे आज ‘अर्थ आवर’ दिवस साजरा केला जात आहे. वीज आणि पर्यावरण जतन करण्याच्या हेतूने ‘अर्थ आवर’ दिवस सुरु करण्यात आला आहे.  वीज वाचवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणजे ‘अर्थ आवर’ दिवस होय. या मोहिमेचे संपूर्ण नाव ‘अर्थ आवर वर्ल्ड वाइड फंड’ असे आहे. जे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ऑर्गनायझेशनने सुरू केले असून, या मोहिमेशी संबंधित कार्यालय सिंगापूरमध्ये आहे.

पहिल्यांदा हा दिवस २००७ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात ६० मिनिटांसाठी सर्व दिवे बंद करून हा उत्सव साजरा करण्यात आला होता. ‘अर्थ आवर’ दिवसांच्या दिवशी, अनिवार्य विद्युतीय उपकरणे बंद ठेवण्याची तात्काळ आवश्यकता असते. यासाठी अनेक लोक सामाजिक साइटवर देखील अपील करतात. वीज वाचवणे आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या संस्थेचे मूळ उद्दीष्ट आहे.

भारताचे केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक ट्विट करत या  मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)