‘रमाकांत आचरेकर’ यांच्या कर्तृत्वाचा सरकारला विसर 

मुंबई – ‘पद्मश्री पुरस्कार’ विजेते रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर गुरूवारी शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सचिन, विनोद कांबळे आणि सारेच क्रिकेटरसिक अत्यंत भावुक झाले. देशाची आणि राज्याची शान वाढवण्यात आचरेकर यांचे मोलाचे योगदान होते.

आचरेकर सरांची ओळख “सचिन तेंडूलकरचे गुरु’ अशी असली तरी त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, जलगती गोलंदाज अजित आगरकर, डावखूरा फलंदाज विनोद कांबळी, प्रवीण आमरे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घतले. आचरेकर यांना 2010 साली पद्मश्री आणि 1990 साली द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्तृत्ववान व्यक्तींचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा भारतामध्ये आहे. साहित्य, कला, आणि राजकीय क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना आजवर अशा पद्धतीनं निरोप देण्यात आला आहे.

मात्र ‘पद्मश्री पुरस्कार’ विजेते रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडला आहे, असे यावेळी दिसून आले. त्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शासकीय इतमामात अंत्यस्कार न केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सोशल मीडियावर मात्र मुंबईकर व क्रीडाप्रेमींनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)