दीक्षित कॉंग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष होणार?

आम आदमी पक्षाबरोबर युतीसाठी कॉंग्रेसचे प्रयत्न

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांची वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान अद्याप त्यांच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याबाबत निर्णय घेणार आहे. त्या गांधी कुटुंबीयाच्या नजिकच्या समजल्या जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शीला दीक्षित ह्या दिल्लीत आपसोबत आघाडी करण्याबाबत अधिक आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आघाडी, युतीबाबत राजकीय पक्ष विचारविनिमय करत आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे.

दिल्लीत आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये युतीबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. माकन यांनी आपल्या राजीनाम्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभारही मानले आहेत.

माकन हे कायमच कॉंग्रेस आणि आपच्या युतीविरोधात होते. त्यामुळे आता माकन यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस आणि आप यांच्यामधील युतीच्या घडामोडींना वेग येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. तीन राज्यांत सरकार स्थापन केल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी समान विचारांच्या लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी तीन राज्यातील विजयानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सर्व समान विचारधारेच्या पक्षांनी एकजूट होऊन भाजपाला हरवण्यासाठी संघर्ष करायला हवा. केजरीवालांनी देखील अनेक वेळा जातीयवादी ताकदींविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करीत युतीचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)