जागतिक बाजारात किमती पडल्याने कॉफी निर्यातीत घट

नवी दिल्ली – गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉफीच्या निर्यातीत 7.36 टक्‍क्‍यांनी घसरणीची नोंद करण्यात आली आहे. वजनात जवळपास 3.50 लाख टन इतकी घट निर्यातीत झाली आहे.

कॉफीची वर्गवारी वेगवेगळ्या विभागात करण्यात आली तेव्हा रोबस्टामध्ये झालेल्या कमी निर्यातीनेच ही घसरण झाली असल्याचे निर्यातदारांच्या संघटनेने म्हटले आहे. सन 2017 मध्ये 3.78 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली होती. परंतु सध्या जागतिक बाजारात किमती कमी झाल्यामुळे निर्यातीच्या मूल्यातही घट झाली आहे.

सन 2018 ला कॉफी निर्यातीत कमाईत 5,770 कोटी रुपयांची घट झाली आहे. ही कमाई 2017 मध्ये 6,091 कोटी रुपये झाली होती.भारत देश हा तिसऱ्या क्रमाकांचा कॉफी उत्पादन व निर्यात करणारा देश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2018 च्या समाप्तीदरम्यान देशात 3,16,000 टन कॉफीचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)