चेतेश्‍वर पुजाराची टी-20 सामन्यात शतकी खेळी

नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीगसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत संघ मालकांनी गेल्या चाअर वर्षांपासून सातत्याने नाकारलेल्या चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्‍ताक अली ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत रेल्वे संघाविरुद्ध खणखणीत शतक ठोकले. कसोटीपटू असा शिक्‍का बसलेल्या पुजाराला एकाही आयपीएल संघाने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले नाही. पण, त्याने गुरुवारी 61 चेंडूंत नाबाद 100 धावा चोपून आयपीएल संघ मालकांना जणू चपराकच मारली. सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना पुजाराने रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

सय्यद मुश्‍ताक अली टी 20 स्पर्धेतील क गटाच्या पहिल्या सामन्यात रेल्वेने नाणेफेक जिंकून सौराष्ट्रला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. हार्विक देसाई आणि पुजारा यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. देसाई बाद झाल्यानंतर पुजारा व रॉबीन उथप्पा यांनी रेल्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 82 धावा जोडल्या. उथप्पानं 31 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 46 धावा केल्या. पुजाराने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवताना 1 षटकार व 14 चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)