कॉलड्रॉपचे प्रमाण वाढल्यामुळे ग्राहक हैराण

नवी दिल्ली – टेलिकॉम कंपन्या जून-सप्टेंबर या कालावधीत सर्व्हिस बेंचमार्क क्वालिटीच्या आधारावर काहीशी डळमळीत राहिल्यामुळे ग्राहकांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. ट्रायने आपला एक अहवाल सादर केलेला आहे. यात काही मोबाईल कंपन्याच्या कॉल सेवेत कॉलड्रॉप वाढले असल्याचे नोंदवण्यात आहे.

सदरची समस्या ही नेटवर्कच्या समस्येमुळे निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. ग्राहकांना योग्य सेवा देण्यात आयडिया आणि व्होडाफोन यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश, आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये आयडीयाच्या नेटवर्कची समस्या तयार झाली.

तर अन्य ठिकाणी व्होडाफोनचे नेटवर्कमध्ये बिघाड होत गेल्याने कॉल ड्रापची समस्येत मोठी वाढ होत गेल्याची नोंद यावेळी केली आहे. ग्राहकांना योग्य सेवा देण्यात कमी प्रयत्न होत आहेत व त्यात ग्राहकांच्या नुकसानीची रक्‍कम ही परत करण्यास कंपनीकडून योग्य प्रयत्न करण्यात आले नसल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)