मोबाइल फोनचा काळाबाजार

आयात शुल्काबरोबरच जीएसटी चुकविला जातो

नवी दिल्ली – मोबाइल फोन आयात शुल्क आणि जीएसटी न भरता ग्राहकांना विकले जातात. त्यामुळे 2500 कोटी रुपयांचा महसूल दर वर्षी बुडतो असा दावा इंडिया सेल्युलर अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन या संस्थेने केला.

यावर पर्याय म्हणून 20 हजार रुपयांच्या वरील मोबाइल फोनवर 4 हजार रुपयाचे आयात शुल्क लावले जावे. सध्या अशा फोनवर 20 टक्के आयात शुल्क लावले जाते. या संस्थेचे अध्यक्ष पंकज महेंद्रु यांनी सांगितले की, आयात शुल्क टाळून व जीएसटी न भरता हे फोन भारतीय ग्राहकांना दिले जात असल्याचे दिसून येते.

या संस्थेने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक निवेदन दिले असून यात आयात शुल्क वाढविण्याची मागणी केली आहे. देशात मोबाइल निर्मिती वाढावी याकरिता केंद्र सरकार 5 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. मात्र, याला फारसे यश मिळत नाही. उलट परदेशातील मोबाइल भारतीय ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. त्याचबरोबर यासाठी जे आयात शुल्क द्यावे लागते ते टाळले जाते असे त्यांनी सांगितले. सध्या मोबाइलवरील जीएसटी 12 टक्के आहे तर मोबाइल संबंधातील इतर उपकरणावर 18 टक्के आहे. ही विसंगती कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)