भाजपाकडून सवर्णांना निवडणुकांसाठी आरक्षण : डी राजा

नवी दिल्ली – सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचे केंद्र सरकारचे धोरण म्हणजे केवळ चुनावी जुमला असल्याचे आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच असे निर्णय अनेक राज्यांनी याआधीच घेतले आहेत. मात्र ते निर्णय न्यायालयात टिकले नसल्याचे सांगत ही मोदी सरकारची नौटंकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला सवर्णांचा रोष पत्करावा लागल्याने नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे सांगून भाकपचे नेते डी राजा म्हणाले, की 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने सरकारने सवर्णांचा राग कमी करण्याची धडपड चालविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही शुद्ध घबराट आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्‍के आरक्षण देण्यासाठी संविधानाच्या 124व्या संशोधन विधेयक मंगळवारी लोकसभेत ठेवण्यात आले. याला कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)