विरोधकांचे पंतप्रधानपदाचे 9 उमेदवार – शहा

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली -पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तानात हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आदी अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे त्यांना असाहाय्य स्थितीत भारतात यावे लागते. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही मानवतेच्या नात्याने घेत आहोत. यासाठीच नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली जात आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हा कायदा करून बांगला देशातून आलेल्या बंगाली हिंदूंना संरक्षण दिले जाईल. विरोधकांचे महागठबंधन केवळ सत्तेच्या स्वार्थांपोटी निर्माण झाले असून ते देशाला स्थिर आणि भक्कम सरकार देऊ शकणार नाही, असा हल्लाबोल शहा यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महागठबंधन मजबूत नसून मजबूर आहे. विरोधी पक्षांमधील आंतर्विरोध अतिशय तीव्र असून ममता बॅनर्जींच्या रॅलीत जमलेल्या 23 नेत्यांपैकी 9 जण पंतप्रधनापदाचे उमेदवार आहेत, अशीही टिप्पणी त्यांनी केली. देशाला भाजपच स्थिर आणि विकासाभिमुख सरकार देऊ शकेल. आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी जीवघेणी स्पर्धा नाही. विरोधी पक्षांनी कितीही नेते जमविले तरी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)