तामिळनाडूत भाजपाला उपरती; मित्रपक्षांना सोबत घेण्याचे दिले संकेत

नवी दिल्ली – तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधतांना जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याचे संकेत दिले. राजकीय पक्षांचे दरवाजे सदैव खुले असतात, आपला पक्ष जुन्या मित्रांचा आदर करतो. अटलबिहारींनी यशस्वी आघाडीच्या राजकारणाची नवी संस्कृती आणल्याचे ते म्हणाले.

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या सज्जतेसाठी कंबर कसली आहे. मोदी पुन्हा एकदा 2014 च्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने दक्षिण भारतातील राज्यांवर नजर केंद्रीत केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी रालोआच्या माजी सहकाऱ्य़ांना पुन्हा आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत मोदींनी तामिळनाडूच्या राजकीय पक्षांच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक दोन्ही पक्ष भाजपचे सहकारी राहिले आहेत.

निवडणूकपूर्व संभाव्य महाआघाडीचा मार्ग रोखण्यासाठी मोदींनी सहकाऱ्य़ांना एकत्र आणण्यासाठी ही खेळी केल्याचे मानले जाते. तामिळनाडूत सत्तारुढ अण्णाद्रमुक, अभिनेते रजनीकांत यांचा पक्ष किंवा द्रमुक यापैकी कोणासोबत आघाडीसाठी चर्चा सुरू आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

रालोआची बळकटी परस्पर विश्वास दर्शविते आणि यात कोणतीही हतबलता लपलेली नाही. भाजप पूर्ण बहुमतासह सत्तेवर आला असला तरीही आम्ही सहकाऱ्य़ांना सोबत घेऊन सरकार चालविण्यास प्राधान्य दिल्याचे मोदी म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात द्रमुक रालोआचा सदस्य राहिला आहे. तर जयललितांच्या अण्णाद्रमुकने भाजपला केंद्रात समर्थन दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)