क्वाड्रीसायकलला सर्व राज्यांकडून मिळाली परवानगी

नवी दिल्ली – क्वाड्रीसायकल या वाहनाच्या सादरीकरणाला सर्व राज्याकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रवासी वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करणारी क्वाड्रीसायकल बजाज ऑटो कंपनी लवकरच सादर करणार आहे. सध्या भारतात परवानगी नसल्यामुळे ही कंपनी या वाहनाची निर्यात करते. हे वाहन छोटे असल्यामुळे त्याची किंमत ऑटारिक्षापेक्षा थोडी जास्त असणार आहे. मात्र कोणत्याही कारपेक्षा हे वाहन स्वस्त असणार आहे.

सध्याच्या इंजिनानुसार मार्च महिन्यात क्वाड्रीसायकल सादर केली जाणार आहे. मात्र इलेक्‍ट्रिक वाहन क्षेत्रातही कंपनीचे काम वेगाने चालू आहे. त्यामुळे पुढील वर्षी कंपनी ईलेक्‍ट्रीक रिक्षा आणि क्वाट्रीसायकल सादर करणार असल्याचे बजाज ऑटाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यानी कंपनीची नवी ओळख सादर केल्यानंतर सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इलेक्‍ट्रिक दुचाकी सादर करण्यावर कंपनी काम करीत आहे. मात्र त्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्‍यता आहे. दुचाकीवर 28 टक्के इतका कर अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, फक्त लक्‍झरी वस्तूवर 28 टक्‍के जीएसटी असल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र दुचाकी हे वाहन लक्‍झरी प्रकारात मोडत नाही. जास्त करामुळे या उद्योगाबरोबरच ग्राहकावरहीं परिणाम होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)