प्रवासी वाहनांची विक्री अजूनही धिम्यागतीने

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. नवीन वर्षात अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी निर्मिती खर्चात वाढ करून वाहनांच्या मूळ किमतीत वाढ केली आहे. यांचा काहीसा परिणाम वाहनाच्या विक्रीत घट होण्यावर झाल्याचा अंदाज सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरीन यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या माहिती सांगण्यात आले आहे.

नवीन वर्षातील जानेवारीत होलसेल प्रवासी वाहन विक्रीत 1.87 इतकी घसरण होत 28,0125 युनिट इतकी विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत काही प्रमाणात वधार झाल्याची नोंद केली असून ही वाढ 2.21 टक्‍क्‍यांनी होत 87 हजार 591 युनिट झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

यातील तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 13.59 टक्‍क्‍यांनी घसरण होत 54,043 युनिटवर पोहोचल्याचे पाहावयास मिळाले आहे. वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या उत्पादन खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या मागणीत 5.18 टक्‍क्‍यांवर येत 1597572 इतकी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)