#AUSvSL : ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

कॅनबेरा – जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 बाद 384 धावा केल्या आहेत.

दिवसअखेर सलामीवीर जो बर्न्स नाबाद 172 धावा तर कुर्टीस पॅटरसन 25 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला त्यांची 3 बाद 23 अशी बिकट अवस्था झाली होती; परंतु त्यानंतर हेड आणि बर्न्स यांनी चौथ्या गड्यासाठी 308 धावांची भागीदारी केली. हेड 161 धावा करून बाद झाल्यानंतर बर्न्स आणि पॅटरसन जोडीने आणखी पडझड होऊ दिली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/OfficialSLC/status/1091231207684227074

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)