ऍमेझॉन कंपनीचे ऍक्‍सिस बॅंकेशी सहकार्य

मुंबई – ई-कॉमर्स कंपन्यांपैकी ऍमेझॉनने भारतात पेटीएम आणि फोनपेला टक्‍कर देत स्वतःची यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सुविधा सुरू केली आहे. ऍक्‍सिस बॅंकेशी संलग्न ही सुविधा असून ऍमेझॉन ऍप्लिकेशनवर उपलब्ध करण्यात आली आहे.

वापरकर्त्यांनी या सुविधेसाठी त्यांच्या बॅंक खात्याला यूपीआय ऍपशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर पेटीएम, फोनपे या ऍपप्रमाणे पैसे पाठविणे किंवा प्राप्त करणे उपलब्ध होणार आहे. बॅंक खाते क्रमांक आणि बॅंक आयएफएससी कोडची गरज यूपीआय सर्व्हिसमध्ये गरजेची नाही. फक्‍त व्हर्च्यूअल पेमेंट ऍड्रेसच्या आधारे कुठेही पैसे पाठवता येणार आहे. डिजिटल इंडियासाठी केंद्र सरकारकडून भीम अप्लिकेशन सुरू करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेकांना त्यामुळे फायदा झाला होता. शिवाय गुगलपे सारख्या ऍप्लिकेशनचा सुद्धा मोठया प्रमाणात वापर होत आहे. आता ऍमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे. त्याचा ग्राहकांना लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)