वर्षभरात रस्ते अपघातात 4.45 लाख मृत्यू

नवी दिल्ली -सरकारने देशात होणाऱ्या रस्ते अपघातबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. 2015-17 दरम्यान तीन वर्षात रस्ते अपघातात तब्बल 4.45 लाख जणांना जीव गमवावा लागला आहे.

सरकारने लोकसभेत शुक्रवारी ही माहिती दिली. खासदार राकेश सिंह यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना परिवहन राज्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2015 मध्ये पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले त्यात 1 लाख 46 हजार 133 जणांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये 4 लाख 80 हजार 652 अपघात झाले त्यात 1 लाख 50 हजार 785 जणांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये 4 लाख 64 हजार 910 अपघात झाले, त्यात 1 लाख 47 हजार 913 जणांना जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)