“ग्रामपंचायत आपल्या दारी’ सुरेगावातील उपक्रमाला प्रतिसाद

सुरेगाव (ता. नेवासे) : येथील "ग्रामपंचायत आपल्या दारी' उपक्रमांतर्गत पदाधिकारी ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.

नेवासे फाटा – नेवासे तालुक्‍यातील सुरेगाव ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या “ग्रामपंचायत आपल्या दारी’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वॉर्डवाईज नागरिकांशी सुसंवाद साधून ज्येष्ठ नेते बद्रीनाथ शिंदे हे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न उपक्रमांतर्गत करीत आहे.

शिंदे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालयाची गरज, त्याचे महत्त्व कळावे. उघड्यावर शौचास गेल्यास होणारे आरोग्यावर परिणाम याविषयी आम्ही मार्गदर्शन केल्यानंतर गावकरी स्वतः पुढे आले. यामुळे आम्हीही आतापर्यंत 382 शौचालये पूर्ण झाले आहेत. दीडशे घरकुलेही मंजूर झाली आहेत. मागेल त्याला घरकुलाचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न तीन वर्षामध्ये केला आहे. राहिलेल्या दोन वर्षात उर्वरित कामे सुसंवादाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहेत. ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगातून पाणी समस्या सोडविण्यासाठी तळ्याची निर्मिती केली जाणर आहे. विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच लोकार्पण कार्यक्रम होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

-Ads-

सरपंच विजया शिंदे, माजी सरपंच अण्णासाहेब पटारे, फळांचे व्यापारी गफूरभाई बागवान, उपसरपंच मोहन शिंदे, शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, नंदकिशोर शिंदे, भाऊसाहेब शिंदे, विठ्ठल शिंदे, एकनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, सुनील शिंदे, अशोक भोले, माणिकराव शिंदे, यासिन सय्यद, दगडू औटी, अशोक जायगुडे, आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)