भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उपोषण

नेवासे पंचायत समितीसमोर सुरु असलेले उपोषण तीसऱ्या दिवशी पंचायतराज समितीच्या आश्वासनाने सोडण्यात आले.

नेवासेफाटा – नेवासे तालुक्‍यातील माळीचिंचोरा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे नेवासे पंचायत समितीसमोर सुरु असलेले उपोषण तीसऱ्या दिवशी पंचायतराज समितीच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले.

उपोषणप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया अंबाडे, नेवासे कॉंग्रेस कमिटीचे तालुका शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी भेट देऊन उपोषणार्थीना पाठींबा दिला होता.

शुक्रवारी उपोषणाचे नेतृत्व करणारे युवा नेते सतीश गोडसे, भीमराज शेंडे, आबासाहेब चिंधे यांच्याशी चर्चा झाली. अहवाल बैठकीत सादर करून, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात करू, असे आश्वासन पंचायतीराज समितीचे विभागप्रमुख आमदार भगत गोगावले यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते मोहन चिंधे, हसनभाई सय्यद, शिवाजी चिंधे, संजय चिंधे, शिवाजी चिंधे, भाऊसाहेब गायकवाड, पांडुरंग शेंडे उपस्थित होते.

वैयक्तिक स्वार्थासाठी हे उपोषण- मयूर शेंडे उपसरपंच

याबाबत आपली प्रतिक्रिया देतांना माळीचिंचोरा गावचे उपसरपंच मयूर शेंडे म्हणाले, ग्रामपंचायतीचा कारभार हा पारदर्शक आहे. गेल्या 40 ते 45 वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. हे उपोषण वैयक्तिक स्वार्थासाठी व राजकीय द्वेषातून केले आहे. आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)