#PAKvNZ 1st Test : न्यूझीलंडचा पाकवर 4 धावांनी विजय

अबुधाबी – पाकिस्तान वि. न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर 4 धावांनी विजय मिळविला आहे. या विजयासह न्यूझीलंड संघाने तीन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज अजज पटेल याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

दरम्यान कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने बिनबाद 37 धावा केल्या होत्या आणि त्यांना सामना जिंकण्यासाठी आणखी 139 धावांची गरज होती. न्यूझीलंडचा दूसरा डाव 249 धावांत संपल्यानंतर पाकसमोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान होते.

चौथ्या दिवशी बिनबाद 37 वरून पुढे खेळताना आज न्यूझीलंडच्या अजज पटेल याच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ अक्षरक्षा गडगडला. पाकिस्तानचा संघ सर्वबाद 171 धावांच करू शकल्याने त्यांना केवळ 4 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या अजज पटेलने 5 तर ईश सोढी आणि नील वॅगनर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत न्यूझीलंडच्या संघाला विजय प्राप्त करून दिला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात अजहर अलीने सर्वाधिक 65 तर असद शफीफने 45 धावा केल्या, मात्र ते संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)