#NZvSL T20I : न्यूझीलंडची श्रीलंकेवर 35 धावांनी मात

ऑकलंड – न्यूझीलंड विरूध्द श्रीलंका यांच्यातील एकमेव टी-20 क्रिकेट सामना ऑकलंड येथील ईडन पार्कवरील मैदानावर झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेल याच्या कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेचा 35 धावांनी पराभव करत एकमेव टी-20 सामन्यात विजय संपादन केला.

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जग ब्रेसवेल यांने गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने फलंदाजीत 26 चेडूंत 44 धावा तर गोलंदाजीत 2 षटकातं 19 धावा देत 1 गडी बाद केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 179 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीत राॅस टेलरने 33, डग ब्रेसवेलने 44 आणि स्काॅट कुग्गेलिजनने 15 चेडूंत नाबाद 35 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसुन राजिथाने 3 आणि लसिथ मंलिगाने 1 गडी बाद केला.

विजयासाठी 180 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ 16.5 षटकांत 144 धावांवरच आटोपला. श्रीलंकेकडून थिसारा परेरा याने सर्वाधिक 43 धावा केल्या, त्याच्याशिवाय अन्य कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत लाॅकी फर्ग्युसनने आणि इश सोढीने प्रत्येकी 3 तर टिम साऊदी, स्काॅट कुग्गेलिजन, डग ब्रेसवेल आणि मिचेल सेंटनरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)