#PAKvNZ : अखेरच्या कसोटीत न्यूझीलंडचा पाकवर विजय, 2-1 ने मालिका विजय

अबूधाबी – गोलंदाजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने तीन सामन्याच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात शुक्रवारी पाचव्या दिवशी पाकिस्तानचा 123 धावांनी पराभव करत 2-1 ने मालिकाही खिशात घातली आहे.

सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडने आपला दुसरा डाव 7 बाद 353 वर घोषित केला होता. त्यानंतर पाकिस्तान संघासमोर विजयासाठी 280 धावांचे लक्ष्य होते. मात्र पाकिस्तानचा संघ 156 धावांवरच आटोपला. न्यूझीलंड संघाचा 10 वर्षानंतर आशियामध्ये हा पहिला मालिका विजय ठरला. तसेच पाकिस्तान संघाचा 49 वर्षानंतर आपल्या घरगुती मालिकेत पराभव झाला आहे.

-Ads-

दुसऱ्या डावात पाकिस्तानचा अर्धा संघ केवळ 55 धावातच तंबूत परतला होता. पाकिस्तान संघाकडून बाबर आजमने सर्वाधिक 51 धावा केल्या. आजम बाद झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा पराभव निश्चित झाला. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात टिम साउदी, अजज पटेल आणि समरविले यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले तर काॅलिन डी ग्रैंडहोम याने 1 गडी बाद केला.

कर्णधार केन विलियमसन याला दुसऱ्या डावात केलेल्या शानदार शतकी खेळीमुळे सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दुसऱ्या डावात केन विलियमसनने 139 तर हेनरी निकोल्सने नाबाद 126 धावा केल्या. पाकिस्तानच्या यासिर शाह हा मालिकावीर ठरला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)