#NZvSL Test : न्यूझीलंडचा ‘1-0’ ने मालिका विजय

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर 423 धावांंनी विजय

ख्राईस्टचर्च – नेल वॅग्नर, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 423 धावांनी मात करत विजय साकारला आहे. या विजयासह दोन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 1-0 ने जिंकली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी 660 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था 6 बाद 231 अशी झाली असल्याने कालच न्यूझीलंडचा कसोटी विजय निश्‍चित झाला होता. आज पाचव्या दिवशी पुढे खेळताना श्रीलंकेचे तळाचे फलंदाज केवळ 5 धावांत माघारी परतले. श्रीलंका दुसऱ्या डावात 9 बाद 263 धावांपर्यतच मजल मारू शकली, त्यामुळे त्यांना 423 धावांनी पराभव पत्करावा लागला. अँजेलो मॅथुज हा दुखापतीमुळे सामन्यातून निवृत्त झाल्याने दुशमंथा चमीरा बाद होताच न्यूझीलंडचा विजय झाला.

श्रीलंकेकडून फलंदाजीत दुसऱ्या डावात कुसल मेंडिसने सर्वाधिक 67 आणि दिनेश चंडिमलने 56 धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत नेल वॅग्नरने 4. ट्रेंट बोल्टने 3 आणि टिम साउदी 2 गडी बाद केले.

न्यूझीलंड आणि श्रीलंका याच्यांतील एकदिवसीय क्रिकेट मालिकेस 3 जानेवरीपासून (गुरुवारी) सुरूवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)