#CWC2019 : न्यूझीलंडचे भारतासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान

मॅंचेस्टर – पावसाच्या व्यत्ययामुळे मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना 46.1 व्या षटकात थांबवण्यात आला होता. ज्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या पाच गडी बाद 211 धावा इतकी होती. रॉस टेलर हा नाबाद 67 आणि टॉम लाथम हा नाबाद 3 धावांवर खेळत होते. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांबवण्यात आला होता, तेथूनच आज पुन्हा सुरू झाला.

कालच्या धावसंख्येत न्यूझीलंडने आज केवळ 28 धावांची भर टाकली. न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत 8 बाद 239 धावसंख्येपर्यत मजल मारू शकला. त्यामुळे विजयासाठी भारतीय संघाला 50 षटकांत 240 धावांचे आव्हान मिळाले आहे.

न्यूझीलंड संघाकडून राॅस टेलर याने सर्वाधिक 70 आणि केन विलियमसन याने 67 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार याने 10 षटकांत 43 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here