#NZvBAN ODI Series : न्यूझीलंडचा बांगलादेशला व्हाईटवॉश

डुनेडिन – न्यूझीलंडने बांगलादेशचा तिसऱ्या आणि अखेरच्या क्रिकेट सामन्यात 88 धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट मालिका न्यूझीलंडने 3-0 ने आपल्या नावे केली आहे.

दरम्यान बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने हेनरी निकोल्स (64), राॅस टेलर (69) आणि टाॅम लाथम (59) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 330 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.

विजयासाठी 331 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. बांगलादेशचे सुरूवातीचे तीन फलंदाज अवघ्या 2 धावांत माघारी परतले होते. मुशफिकुर रहीमही 17 आणि महमूदुल्लाह 16 धावा काढून झटपट बाद झाले. त्यानंतर सब्बीर रहमान 102 आणि मोहम्मद सैफुद्दीनने 44 धावा काढत संघर्ष केला. मात्र दुसऱ्या बाजूने फलदांज बाद झाल्याने बांगलादेशचा संघ 47.2 षटकांत 242 वर आटोपला. त्यामुळे बागंलादेशला 88 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून टिम साउदीने 9.2 षटकांत 65 धावा देत सर्वाधिक 6 गडी बाद केले. तर ट्रेटं बोल्टने 2 आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने 1 गडी बाद केला.टीम साउदी सामनावीर ठरला.

https://twitter.com/ICC/status/1098097979469160448

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)