न्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध असणार

आयपीएल 2019 मध्ये होणार भरपूर बदल..?

मुंबई – आयपीएलच्या आगामी हंगामात विदेशी खेळाडूंच्या सहभागा बद्दल प्रश्‍नचिन्ह असतानाच आयपीएलच्या चाहत्यांच्या दृष्टीने महत्वाची बातमी आली असून आगामी मोसमात न्यूझीलंडचे खेळाडू संपुर्ण मोसमासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याबाबतची परवानगी त्यांना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. सोमवारी मुंबई येथे आयोजित एका विशेष चर्चा सत्रात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे व्यावसायिक सचिव जेम्स वेअर यांनी याबाबतची माहिती दिली.

-Ads-

आयपीएल संपल्यावर लगेच एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा होणार आहे आणि तरी देखील ते त्यांच्या खेळाडूंना संपूर्ण स्पर्धा खेळण्यास परवानगी देत आहेत, यावर बोलताना चर्चा सत्रात जेम्स वेअर म्हणाले की, ‘आम्ही खेळाडूंना संपूर्ण आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी देत आहोत. आम्हाला वाटते की आमच्या खेळाडूंना जगभरात सर्वत्र खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून त्यांची आणि त्यांच्या खेळाची प्रगती व्हावी. आयपीएलमध्ये खेळून त्यांना चांगला अनुभव मिळेल आणि त्यातूनच ते सतत काहीतरी नवीन गोष्टी शिकतील. त्यामुळे आम्ही त्यांना संपूर्ण हंगाम खेळण्याची परवानगी देत आहोत’.

येत्या मे महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये होत असलेल्या एकदिवसीय विश्‍वचषकाचे कारण देत, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत 1 मे नंतर खेळण्यास मनाई केल्यानंतर विदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल प्रश्‍नचिन्ह उभाराहिले होते.

चर्चासत्रात पुढे बोलताना जेम्स वेअर म्हणाले, आयपीएलच्या मागील मोसमात आमचे 11 खेळाडू सहभागी झाले होते. यंदाही आमचे खेळाडू सहभाग नोंदवतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)