#NZvSL : न्यूझीलंडचा श्रीलंकेवर 45 धावांनी विजय

माउंट माउंगानुई – मार्टिन गप्टिलची शानदार शतकी खेळी आणि केन विलियमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 45 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्याच्या क्रिकेट मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दरम्यान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 371 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 138, केन विलियमसन 76, राॅस टेलर 54 आणि जिमी नीशमने 47 धावा केल्या. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप आणि थिसार परेरा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

विजयासाठी 372 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 49 षटकांत सर्वबाद 326 धावांपर्यतच मजल मारू शकला. श्रीलंकेकडून कुसल परेराने 102 धावा केल्या पण संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. तर निरोशन डिकवेलाने 76 आणि दनुश्का गुणाथिलाकाने 43 धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत जिमी नीशमने 3 तर ईश सोढी, लाॅकी फर्ग्यूसन आणि ट्रेट बोल्टने प्रत्येकी 2 गडी बाद केले. मार्टिन गप्टिल हा सामनावीर ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)