कार्डिफ – मैट हैनरी आणि लाॅकी फर्ग्युसन यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर मार्टिन गप्टिल आणि काॅलिन मुनरो यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेवर 10 गडी आणि 203 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला आहे.
New Zealand won by 10 wickets, NZ 137/0 (16.1) v SL 136 (29.2) Martin Guptill 73*, Colin Munro 58*. #NZvSL #CWC19 pic.twitter.com/UnFJfzImCu
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 1, 2019
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टाॅस जिकंत गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेच्या संघास प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकाचा डाव 29.2 षटकांत सर्वबाद 136 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या न्यूझीलंडने हे आव्हान 16.1 षटकांत बिनबाद 137 धावा करत सहज पूर्ण केलं.
न्यूझीलंडकडून आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल याने नाबाद 73 आणि काॅलिन मुनरो याने नाबाद 58 धावा करत संघास विजय प्राप्त करून दिला. यावेळी श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाला गडी बाद करण्यात यश मिळाले नाही.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघास 29.2 षटकांत सर्वबाद 136 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली, त्यामुळं न्यूझीलंडला विजयासाठी 50 षटकांत केवळ 137 धावाचं आव्हान मिळालं होतं.
श्रीलंका संघाकडून फलंदाजीत दिमुथ करूणारतने याने सर्वाधिक नाबाद 52 धावा केल्या. तर कुसल परेराने 29 आणि थिसारा परेराने 27 धावा केल्या. श्रीलंकेचे तीन फलंदाज कुसल शुन्यावर बाद झाले, यामध्ये कुसल मेंडिस, एंजलो मैथ्यूज, इसुरू उदाना या फलंदाजाचा समावेश आहे.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मैट हैनरी याने 7 षटकांत 29 धावा देत 3 तर लाॅकी फर्ग्यूसन याने 6.2 षटकांत 22 धावा देत 3 गडी बाद केले. ट्रेटं बोल्ट, काॅलिन डी ग्रैंडहोम, जिमी नीशम आणि मिचेल सैंटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.