पालिका शाळेतील मुलांना नवीन वर्षाची भेट ; आता शनिवारी दप्तराला सुट्टी

पुणे: महापालिका शाळेतील सुमारे 1 लाख मुलांना महापालिकेने नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. या महिन्यापासून प्रत्येक शनिवारी आता दप्तर विना शाळा भरणार असून त्याबाबतचे आदेश पालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सर्व शाळांना दिले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमा सोबतच मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या दिवशी घेतले जाणार आहेत.

पालिका शाळांमधील मुलांची उपस्थिती शनिवारी लक्षणीय घटत असल्याने हा निर्णय घेतल्याचे दौंडकर यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या सुमारे 287 शाळा असून त्यात बालवाडी ते दहावीपर्यंत जवळपास 1 लाख मुले शिक्षण घेतात. मात्र, मुलांची उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय राहिल्याने खासगी शाळांप्रमाणेच दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गेल्या काही वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यात मुलांच्या सर्वांगीन विकासासह व्यक्‍तिमत्त्व विकासाचे उपक्रमही स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून राबविले जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, पालिकेच्या शाळांमधील बहुतांश मुले ही आर्थिक दुर्बल कुटूंबातील असल्याने पालक रविवारच्या सुट्टीसह, शनिवारीही मुलांना आपल्यासोबत कामासाठी मदतीला घेतात. त्यामुळे ही मुले शनिवारी शाळेत येत नाहीत. तसेच शनिवारी अर्धी शाळा असल्याने मुलांचा कलही शाळेकडे नसतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने राबविलेल्या “दप्तरविना शनिवार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्या अनुषंगाने मुख्याध्यपकांना सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. तसेच मुलांसाठी प्रत्येक शनिवारी कोणकोणते उपक्रम राबविता येतील, याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानंतर हे आदेश काढण्यात आले होते.

शाळांमध्ये शनिवारी घेतले जाणार हे उपक्रम

1) सुर्यनमस्कर, सामूहिक कवायत, मेडीटेशन
2) गायन तासिका
3) चित्रकला व कार्यानुभव तासिका
4) ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड प्रकल्प ( वाचन प्रकल्प)
5) संगणक प्रशिक्षण
6) मूल्य शिक्षण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)