ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने पुन्हा नव्याने मतदान घेण्यात यावे – चंद्राबाबू नायडू  

नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र लिहीत निवडणुकीत अनियमिता असल्याची तक्रार केली आहे. काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदार तेथून निघून गेले. यासाठी निवडणूक आयोगाने याठिकाणी पुन्हा नव्याने मतदान घ्यावे, अशी मागणी चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी म्हंटले कि, आंध्रप्रदेशमधील १५७ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन खराब झाले आहेत. यामुळे अनेक मतदार मत न करताच निघून गेले. तेलगू देसम पक्षाने या मतदान केंद्रावर पुन्हा नव्याने मतदान करण्याची विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1116216514917617670

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)