जाणून घेऊयात ‘फॅब फोर’ मधील नवीन स्पर्धेबाबत…

राजकुमार ढगे
सचिन तेंडूलकर, कुमार संगाकारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि अन्य काही मोठ्या खेळाडूंच्या निवृत्ती नंतर नव्या दमाच्या खेळाडूंचा क्रिकेटध्ये दबदबा राहिला. भारताचे चार महान फलंदाज सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांना क्रिकेट वर्तुळात ‘फॅब फोर’ म्हणून ओळखले जायचे. यांच्या निवृत्तीनंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विलियमसन या चौघांना सध्या क्रिकेटवर्तुळात ‘फॅब फोर’ म्हणून ओळखले जाते. ते सतत मोठे विक्रम आणि धावा करताना दिसतात. सध्या याच चार फलंदाजांमध्ये स्वतःला बाकीच्या फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची चुरस आहे.
आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना हे खेळाडू खोऱ्याने धावा जमावात आहेत. विराट कोहली भारतीय संघासाठी, जो रुट इंग्लंडसाठी तर स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियमसन अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँडसाठी जबरदस्त खेळ करत आहे. स्मिथवर सध्या एकवर्षाची बंदी आहे. त्यामुळे हा फलंदाज कमीतकमी आणखी ८ महिने मैदानाबाहेर राहील.
विराट कोहली आणि जो रूट आजपासून आपल्याला भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेत एकमेकांसमोर दिसतील. त्यामुळे इंग्लंडच्या धर्तीवर ‘कोहली श्रेष्ठ की जो रुट’ याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली तर आपणास कसोटी क्रमवारीतील मानांकन सहज दिसेल. यामध्ये फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९२९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ९०६ गुणांसह विराट कोहली, जो रुट(८५५) आणि नंतर केन विलियमसन(८४७) आहेत.
विराट आणि स्मिथ यांच्यामध्ये २३ गुणांचा फरक आहे तर रुट आणि विलियमसन यांच्या क्रमवारीतील गुणांमध्ये फक्त ८ गुणांचा फरक आहे. या वरून या फॅब फोर मधील चुरस खूप प्रेक्षणीय ठरणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपण्याच्या अगोदर आपणाला क्रमवारीत मोठा बदल झालेला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे या खेळाडूंमध्ये कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर येण्यासाठी स्पर्धा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)