म्युच्युअल फंडातर्फे नवीन योजना

मुंबई – मिराए ऍसेट म्युच्युअल फंडाने निश्‍चित उत्पन्न गटात मिराए स्थिर मुदतपुर्ती-मालिका तीन (मिराए ऍसेट फिक्‍स्ड म्युच्युरिटी-सिरीज थ्री) हा नवीन फंड बाजारात आणला आहे. या फंडाची मुदत 1122 दिवस आहे. सदर एफएमपी फंडातील निधी प्रामुख्याने ट्रिपल ए रेटींग असलेले कंपनी रोखे तसेच चलन बाजारातील विविध साधनांमध्ये गुंतविला जाणार आहे. या योजनेच्या मुदतपूर्तीआधी मुदतपूर्ती असलेल्या साधनातच गुंतवणुकीची खबरदारी घेतली जाणार आहे.

सध्याच्या प्रचलित व्याजदरानुसारच ही गुंतवणूक अपेक्षित आहे. निश्चित उत्पन्न विभागाचे प्रमुख महेंद्र जाजू यांच्याकडे या फंडाची जबाबदारी राहणार आहे. मिराए म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूकीने वीस हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून फंड 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत एकूण 23 हजार 900 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)