दिल्ली मुंबई मार्गावर नवी राजधानी सेंट्रल लाईनवर धावणार

वंदना बर्वे

नाशिककरांना नवीन वर्षाची भेट

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: दिल्ली मुंबई मार्गावर लवकरच नवी राजधानी सुरू केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्राने दिली आहे. ही गाडी सेंट्रल लाईनवर चालविली जाणार असल्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्लीमुंबई मार्गावर नवी राजधानी गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या मार्गावर धावणारी ही तिसरी राजधानी असेल. दोन राजधानी ट्रेन पश्‍चिम मार्गावर चालविल्या जातात. परंतु, नवी राजधानी नवी राजधानी सेंट्रल लाईनवर धावणार आहे.

नवीन राजधानी हजरत निजामुद्यीनपासून सुरू होईल आणि आग्रा, झांसी, भोपाळ, खंडवा, जळगाव, नाशिक आणि कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत चालविली जाईल. गाडीचा मुहुर्त ठरायचा असला तरी एकदीड महिन्यात याचा शुभारंभ होईल, अशी आशा सूत्राकडून वर्तविण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली आहे. फडणवीस यांची वेळ ठरताच नवीन राजधानीचा मुहुर्त निश्‍चित केला जाईल. सध्या नाशिककरांना दिल्लीला येण्यासाठी राजधानी पकडायची असेल तर त्यांना मुंबईला लांब जावे लागते. परंतु, नवी राजधानी सुरू होताच नाशिककरांचा त्रास कायमचा दूर होईल, असे रेल्वेच्या सूत्राचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)