आयसिसच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा : उत्तरप्रदेश-दिल्लीत एनआयएची छापेमारी 

नवी दिल्ली – दहशतवादी संघटना आयसिसच्या (ISIS) मॉड्यूलवर आधारित ‘हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम’चा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज पर्दाफाश केला आहे. ही संघटना उत्तरप्रदेश-दिल्लीमधील अनेक परिसरात सक्रिय होती. एनआयए, दिल्ली पोलीस आणि उत्तरप्रदेश एटीएस यांनी संयुक्त अभियान राबवत १६ ठिकाणी एकाच वेळेत छापे मारले. याप्रकरणी उत्तरप्रदेश अमरोहामधून ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

एनआयएने उत्तरप्रदेशमधील अमरोहा, दिल्लीस्थित जाफराबादसह एकूण १६ ठिकाणी छापेमारी केली. यानुसार अनेक लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे शस्त्रे आणि बॉम्ब बनविण्याचे सामान हस्तगत केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, याप्रकरणी एनआयए आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)