न्यू मेक-अप ट्रेण्डस्‌

नाताळ संपला, नवे वर्षही सुरू झाले. आता संक्रांतीसह एकामागोमाग सण येत आहेत, छान सजण्याचे हे दिवस. या दिवसांत सर्वांनाच आकर्षक दिसायचं असतं त्यामुळे चेहऱ्यासाठी जरा विशेषच तयारी करायची असते. यात सर्वात महत्त्वाचा ठरतो तो चेह-याचा मेकअप. या वर्षी तुमच्या मेकअप कीटमध्ये कोणते रंग इन झाले पाहिजे आणि कसा मेकअप असला पाहिजे यासाठी प्रहारच्या वाचकांकरता ब्युटी आणि मेकअप एक्‍सपर्ट आकृती कोचरकडून काही खास टिप्स.

चेहऱ्याचा मेकअप करताना फाउंडेशनचा वापर मेकअपचा बेस म्हणून केला जातो हे लक्षात घ्या. आपल्याकडे फाऊंडेशन चेहरा उजळ बनवण्यासाठी वापरतात असा समज आहे त्यामुळे मेकअप करताना जर गोरं दिसण्यासाठी तुम्ही फाऊंडेशन वापरत असाल तर ते चुकीचं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुमच्या स्कीन टोनला साजेशा रंगछटेचं फाऊंडेशन निवडा. फाऊंडेशन विकत घेताना चेहऱ्याला नॅचरल लूक येईल अशीच छटा निवडा.

फाऊंडेशन घेताना चांगल्या दर्जाचं फाउंडेशन निवडा. दांडिया, गरबा खेळताना तुम्हाला याचा जास्त उपयोग होईल कारण चांगल्या दर्जाचे फाऊंडेशन चेहऱ्यावरून घाम आला तरी सहसा ओघळत नाही.

शक्‍य असल्यास फाऊंडेशन हातावर घेऊन एकदम पसरण्यापेक्षा चेहऱ्यावर थोडे थोडे लावा आणि ब्रशने पसरवा याने वेगळाच लुक चेहऱ्याला मिळेल.

ब्राउन, गोल्ड, प्लम, पर्पल, ब्लू हे रंग आयशॅडोमध्ये इन कलर्स आहेत. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना तुम्ही या रंगाचा विचार करू शकता.

थंडीचे दिवस आले की आपल्याकडे काळ्या किंवा करड्या रंगाचा किंवा डल रंगाचा मेकअप करण्याचा ट्रेण्ड आहे; परंतु सध्या ही फॅशन आउट झाली आहे त्यामुळे तुम्ही मेकअप करताना बोल्ड आणि ब्राइट रंगांचा वापर करा.

आयशॅडो लावताना सिंगल शेडपेक्षा दोन शेडचा वापर करा. त्यातली एक भडक आणि दुसरी पुसट अशीच रंगछटा निवडा.

आयशॅडो लावताना दोन रंगांच्या छटा वापरत असाल तर त्या एकमेकांत ब्लेण्ड करा. आयशॅडोमध्ये स्मोकी अॅण्ड स्मज लुक इन आहे.

मजेन्डा, बेरी रेड, पिंकच्या सर्व शेड, डार्क रेड, मरून या शेड्‌स लिपस्टीक्‍समध्ये सध्या हॉट मानल्या जात आहेत.

आपल्याकडे बहुतांश मुली डस्की किंवा डार्क स्कीनटोनच्या असतात त्यामुळे लिपस्टीक निवडताना आपल्या चेहऱ्याला शोभून दिसेल अशाच शेड निवडा.

डस्की स्कीन टोनसाठी ब्राउन किंवा बेरी शेडमधलेच रंग निवडा. डार्क स्कीन टोन असेल तर कॉपर, वालनट, हनी, ब्राउन या रंगाच्या शेड तुमच्या ओठांवर छान दिसतील.

लिपस्टीक विकत घेताना त्याच शेडचं लिपलाइनर घ्यायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर डोळय़ांचा मेकअप तरी जास्त करा किंवा ओठांचा तरी. दोन्ही ठिकाणी मेकअप करून चेहऱ्यावर भडकपणा आणण्याचा ट्रेण्ड आता गेला आहे.

– श्रुती कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)