ICC T20I Bowlers Rankings : कुलदीपची क्रमवारीत हनुमान उडी

आयसीसी टी20 क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप

दुबई – भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आयसीसी टी20 क्रमवारीत गोलंदाजीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत कुलदीप प्रथमच पहिल्या पाच गोलंदाजामध्ये दाखल झाला आहे.

आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या तीन टी20 सामन्यांत कुलदीपने चार विकेट घेतल्या. त्यामुळे त्याला 20 क्रमांकाचा फायदा झाला. याआधी मागील महिन्यात आयसीसी व्दारा जाहीर करण्यात आलेल्या टी20 क्रमवारीत कुलदीपने 14 स्थांनाची झेप घेत 23 वे स्थान पटकावले होते.

आयसीसी टी20 क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान हा अव्वलस्थानी तर पाकिस्तानचा शादाब खान हा दुसऱ्या स्थानावर आहे.  इंग्लंडचा रशिद हा गोलंदाज चौथ्या तर अाॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज अॅजम झम्पाने 23 व्या स्थानावरून 5 व्या स्थानी उडी घेतली आहे.

गोलंदाजीत कुलदीपशिवाय भारताचा फिरकीपटू चहल हा 11 व्या स्थानी आहे तर भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराह अनुक्रमे 20 व्या आणि 21 व्या स्थानावर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)